1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 13 डिसेंबर 2021 (14:49 IST)

पुढील परीक्षेसाठी परीक्षार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही : आव्हाड

म्हाडाची परीक्षा रद्द करण्यात आली. यानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे म्हाडा बाहेरच्या संस्था किंवा कंत्राटदारांऐवजी स्वत: परीक्षा घेईल, असं जितेंद्र आव्हाड  यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच परीक्षेसाठी परीक्षार्थ्यांकडून आकारलेले संपूर्ण शुल्क  परत करण्यात येणार आहे. शिवाय पुढील परीक्षेसाठी परीक्षार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.
 
 पेपर फुटण्याच्या आधीच परीक्षा रद्द केली. पेपर फुटल्याची माहिती देखील म्हाडाला मिळाली होती. पेपर फुटल्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असता तर नक्कीच ते नामुष्कीचे ठरलं असतं. याशिवाय अभ्यास केलेल्या परीक्षार्थ्यांवर अन्याय झाला असता, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.