शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 जानेवारी 2019 (09:42 IST)

विधर्भात अवकाळी पाऊस पडणार, शेतकरी चिंता वाढणार

पुढील  दि. २४ व २६ जानेवारी या दिवसांत विदर्भात प्रमुखपणे पूर्व-विदर्भात वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. यामध्ये भंडारा, गोंदीया तील बऱ्याच भागात मेघ-गर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करावे आणि शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा असे आवाहन केले आहे. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर तो व्यवस्थितपणे झाकून ठेवावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत केले आहे. ढगाळी वातावरणामुळे विदर्भातील कमाल तापमान कमी होणार आहे. किमान २९ जानेवारीपर्यंत तरी कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी होईल असा अंदाज आहे. वाढलेल्या आर्द्रतेमुळे दि. २५ ते २७ जानेवारी या काळात काही प्रमाणात धुकं पडेल आहे. मराठवाड्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहील आणि नांदेड जिल्ह्यांतील काही भागात हलक्या पावसाची शक्यता राहील असे सांगितले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडण्याची शक्यता आहे.