1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 29 मार्च 2023 (21:02 IST)

ही आत्महत्या नसून खून आहे, मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप

Mohit Kamboj
अनंत करमुसे मारहाण प्रकरणी माफीचा साक्षीदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे माजी अंगरक्षक वैभव कदम यांनी आत्महत्या केली आहे. परंतु ही आत्महत्या नसून खून आहे, असा गंभीर आरोप भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केला आहे.
 
मोहित कंजोब यांनी ट्विट करत एका व्हिडीओच्या माध्यमातून गंभीर आरोप केले आहेत. माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, या प्रकरणी तात्काळ तक्रार दाखल करण्यात यावी. जे पोलीस जनतेची सेवा करतात. जर तेच सुरक्षित नसतील किंवा त्यांना न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांचं काय?, असा सवाल मोहित कंबोज यांनी उपस्थित केला.
 
वैभव कदम हे जितेंद्र आव्हाडांचे सुरक्षारक्षक होते. एवढ्या मोठ्या हायप्रोफाईल प्रकरणातल्या आरोपीचा असा संशयास्पद मृत्यू होतो. राज्यात अजून एक मनसुख हिरेन आणि सुशांत सिंग राजपूत सारखं प्रकरण झालंय, असा आरोप कंबोज यांनी केला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor