शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मार्च 2023 (13:01 IST)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन आला आहे. रात्री 2 वाजेच्या सुमारास नागपूर पोलीस कंट्रोल रूम मध्ये घरासमोर बॉम्ब ठेवल्याची माहिती फोन करून दिली गेली. फोन कन्हान भागातील एका व्यक्तीने केला असून घराची वीज गेल्याच्या रागावरून त्या व्यक्तीने फोन केला होता.   
फोन आल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरी रात्री बॉम्ब शोध पथक यांच्यासह पोलीस सुरक्षा वाढविण्यात आली.घराच्या परिसराची तपासणी केल्यावर काहीही आढळून आले नाही. फोन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
 
Edited By- Priya Dixit