जेवणातून विषबाधा होऊन तीन मुलांचा मृत्यू, आईवर उपचार सुरु
बीडच्या आंबेजोगाई तालुक्यात वागझरी गावात तीन चिमुकल्यांचा अन्नातून विषबाधा होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर या मुलांची आई मृत्यूशी झुंझ देत आहे. साधना घारासुरे (6), श्रावणी घारासुरे(4) आणि नारायण घारासुरे(8 महिने) असे या मयत मुलांची नावे आहेत. तर आई भाग्यश्री घारासुरे(28) ही मुलांची आई रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबेजोगाई तालुक्यातील वागझरी गावात काशिनाथ घारासुरे आणि त्यांच्या कुटुंबाने रात्री घरी जेवण केले. त्यांनतर त्यांच्या कुटुंबातील त्यांची बायको आणि तिन्ही मुलांना त्रास होऊ लागला.त्यांनी तातडीने त्यांना सर्वाना रुग्णालयात दाखल केले असता तिन्ही मुलांचा मृत्यू झाला तर पत्नी मृत्यूशी झुंज देत आहे. विषबाधा झाल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला असून अद्याप विषबाधाचे कारण समजू शकले नाही. पोलीस घटनास्थळी रवाना झाले असून प्रकरणाची चौकशी करत आहे. एकाच कुटुंबातील तिन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यामुळे गावात शोककळा पसरली आहे.