शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (11:57 IST)

गॅंगवॉर!अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दोन गटांत हाणामारीत तिघांचा मृत्यू

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात रविवारी समाज सुधारक अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यासाठी दोन गटांमध्ये झालेल्या रक्तरंजित चकमकीत तीन जण ठार झाले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कुंडल पोलीस स्टेशन परिसरातील दुथोंडी गावात ही घटना घडली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जयंती साजरी करण्यावर मतभेद झाल्यानंतर दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. 
 
दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत 25 ते 32 वयोगटातील तीन जण ठार तर तीन जण जखमी झाले. दोन गटांतील मारामारीदरम्यान धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला. आम्ही काही लोकांना ताब्यात घेतले आहे आणि तपास सुरू केला आहे,असे अधिकारी म्हणाले. अरविंद साठे,विकास मोहिते,सनी मोहिते असे मृतकांची नावे आहेत.

तुकाराम साठे, अण्णाभाऊ साठे म्हणून प्रसिद्ध, एक समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. ते त्यांच्या लेखनासाठी आणि राजकीय सक्रियतेसाठी, जाणले जातात .त्यांना  'दलित साहित्याचे संस्थापक' म्हणून श्रेय दिले जाते.