1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (13:04 IST)

काळाने घात केला , ट्रॅक्टर घरावर उलटून झोपेतच महिलेचा मृत्यू झाला

Time struck
पाथरी तालुक्यात बाभळगावात आज पहाटे 5 वाजता साखर कारखाण्याकडे ऊस घेऊन भरधाव वेगाने जात असलेला ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन रस्त्याच्या बाजूच्या घरावर उलटून उसाच्या ढिगाऱ्याखाली दबून घरात झोपलेल्या 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर 8 वर्षाची मुलगी गंभीररित्या जखमी झाली आहे .
मिळालेल्या माहितीनुसार, बाभळगाव येथील एका शेतकऱ्याचा ऊस माजलगाव येथी उसाच्या कारखान्यात जात होता. ट्रॅक्टर वेगाने होता. चालकाचा ताबा सुटून ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या पत्र्याच्या घरावर जाऊन आदळून उलटला. या वेळी घरात झोपलेल्या पारुबाई रंगनाथ पवार (55) आणि त्याची आठ वर्षाची नातं शिवानी संजय जाधव या उसाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्या त्यांना काहीच हालचाल करता येई ना. अपघाताची माहिती मिळतातच गावकरी धावत गेले आणि त्यांनी उसाच्या मोळ्या बाजूला केल्या. या अपघातात नातं शिवानी गंभीररित्या जखमी झाली  तर पारुबाई यांचा दुर्देवी अंत झाला. नातीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवा ने घरात बाजूला झोपलेल्या पुष्पा पवार या बचावल्या.