बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 ऑगस्ट 2020 (12:01 IST)

राज्यात पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक

राज्यात रविवारी पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. दिवसभरात ९ हजार ९२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ९५०९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत २ लाख ७६ हजार ८०९ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६२.७४ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४८  हजार ५३७  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत.
 
पाठविण्यात आलेल्या २२ लाख ५५ हजार ७०१ नमुन्यांपैकी ४ लाख ४१ हजार २२८ नमुने पॉझिटिव्ह (१९.५६ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख २५ हजार २६९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ९४४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात रविवारी २६० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५३ टक्के एवढा आहे.