सिंधुदुर्गातील आंबोली धबधब्यावर विषारी साप चावल्याने कर्नाटकातील पर्यटकाचा मृत्यू
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या आंबोली घाटावर आणखी एक दुःखद घटना घडली आहे. कर्नाटकातील विजयनगरचे रहिवासी असलेले गंगाधर मरियाप्पा कोरवार हे पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी आपल्या सहा मित्रांसोबत आंबोलीला आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास, गंगाधर मुख्य धबधब्याच्या पाण्यात अंघोळ करत असताना, खडकांमध्ये लपलेल्या एका विषारी सापाने त्यांच्या पायाला दंश केला. त्यांच्या मित्रांनी त्यांना तात्काळ सावंतवाडी रुग्णालयात दाखल केले, परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. सावंतवाडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Edited By- Dhanashri Naik
Edited By- Dhanashri Naik

