रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 22 डिसेंबर 2024 (16:31 IST)

26 विद्यार्थ्यांना घेऊन जात असलेल्या बसचा अपघात वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने टळला

drink
कल्याण -ठाणे वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे 26 विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात टळला.वाहतूक पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेत चालकाला बघितल्यावर तातडीन बस थांबवली.हे विद्यार्थी फ़ुटबाल स्पर्धेसाठी जात होते. 

सदर घटना शुक्रवारी सुभाष चौकात घडली. बस जिल्ह्यातील उल्हासनगरहून पालघरच्या विरारला जात होती. 
कल्याण वाहतूक पोलिस वरिष्ठ निरीक्षक यांनी पीटीआयला सांगितले रस्ता मोकळा असून देखील बसचालक वळण घेत असल्याचे पोलिसांना लक्षात आल्यावर चालकाला बस थाम्बवायला सांगितले आणि चालकाची चाचणी घेतल्यावर अहवाल पॉझिटिव्ह आला. 
पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक म्हणाले. वाहतूक पोलिसांनी लक्ष दिले नसते तर अनुचित प्रकार घडला असता. बसचालकाला दंड ठोठवण्यात आला असून त्याच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे. बसला ताब्यात घेऊन मालकाला माहिती देण्यात आली आहे. 
फुटबॉल स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना विरारला नेण्यासाठी दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली आहे. 
 
Edited By - Priya Dixit