रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : रविवार, 22 डिसेंबर 2024 (16:29 IST)

मुंबईत वेगवान क्रेटाने 4 वर्षाच्या मुलाला चिरडले, आरोपीला अटक

arrest
मुंबईतील वडाळा परिसरात 19वर्षीय तरुणाने भरधाव वेगात चालविलेल्या कारने दिलेल्या धडकेत चार वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला . आयुष लक्ष्मण किनवडे असे चिमुकल्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.आरोपीला अटक करण्यात आली आहे. 
 
आंबेडकर कॉलेज वडाळ्याजवळ हा अपघात झाला. मयत मुलगा  त्याच्या कुटुंबासह फ़ुटपाथवर रहायचा.
त्याचे वडील मजूरीचे काम करतात. आरोपी तरुणाने ह्युंदाई क्रेटावरील नियंत्रण गमावले आणि मुलाला जोरदार धडक दिली.आरोपी चालक मुंबईतील विलेपार्ले येथील रहिवासी आहे .

अपघात शनिवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडला असून मुलगा फ़ुटपाथवर आपल्या  झोपडीजवळ खेळत असताना भरधाव वेगात आलेल्या कारने त्याला चिरडले. आयुषचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला. 

अपघाताच्या वेळी क्रेटा चालवणारा भूषण मद्यपान केलेला होता का, याचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. बेदरकारपणे गाडी चालवल्याच्या आरोपावरून पोलिसांनी चालकाला अटक केली असून चौकशी सुरू आहे.
Edited By - Priya Dixit