कॉन्फरन्सद्वारे पत्नीला तीन तलाक
कांदिवली येथे राहणार्या एका महिलेने पतीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या महिलेने कॉन्फरन्स कॉल सुरू असतानाच पतीने तीन तलाक दिल्याचा आरोप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महिलेचं लग्न 2018 साली झालं असून ती पतीसह कळंबोलीला राहत असताना तिचं सासरच्यांशी वाद झाल्यामुळे ती कांदवली पूर्वेला आई-वडिलांकडे आली होती. दरम्यान तिच्या बहिणीने मध्यस्थी करण्यासाठी बहिणीच्या नवऱ्याला फोन केला होता. हे तिघे कॉन्फरन्स कॉलवर बोलत असताना अचानक पीडित महिलेच्या नवऱ्याने तिला फोनवरच तीन तलाक दिल्याचं तिने तक्रारीत म्हटलं आहे.
पीडित महिलेने सांगितले की सासरच्यांचा मागणीवर तिच्या आई-वडिलांनी जावयाला एक गाडी आणि राडो घड्याळ देखील दिले होते. काही दिवस उलटल्यावर त्याने पैसे मागायला सुरुवात केली. मानसिक आणि शारीरिक तणावामुळे तिचा गर्भपात देखील झाला. तरी सासू-सासऱ्यांनी या सगळ्यांसाठी तिला दोषी ठरवत माहेरून पैसे आणण्याची बळजबरी केली. याला कंटाळून ती आई-वडिलांकडे आली होती.