शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मनमाड , गुरूवार, 16 मार्च 2017 (14:26 IST)

माचिस बॉक्स घेऊन जाणारा ट्रक पेटला

मालेगाव रस्त्यावर दहेगाव गावाजवळ आज पहाटे एका माचिस बॉक्स घेऊन जाणा-या ट्रकने पेट घेतल्याची घटना घडली असून यात ट्रक पुर्ण पणे जळून खाक झाला आहे. ट्रक पेट्रोल पंपाजवळच पटल्याने ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक थोडा पुढे नेण्यात यश मिळावल्याने मोठा अनर्थ टळला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रक पूर्णपणे जाळून खाक झाला आहे.

माचीस घेऊन जाणारा ट्रक आणि डम्पर या वेगात येणाऱ्या वाहनाचा धक्का लागल्याने घर्षण होऊन आग लागल्याचा अंदाज आहे. मनमाड अग्निशामक दल आणि इंडियन ऑईल प्रकल्प यांच्या बंब वेळीच दाखल होत आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे ट्रक पूर्णपणे खाक होईपर्यंत आज थांबलीच नाही. या घटनेमुळे मनमाड-मालेगाव रसत्यावरील वाहतूक काही काळासाठी पुर्णपणे ठप्प झाली होती. आता मात्र वाहतूक सुरळीत आहे.

नाशिक शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर एका धावत्या ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे. सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी घडलेल्या या घटनेत मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या ट्रकला (MH ४० Y 4467) अचानक आग लागली. ट्रक बाजूला घेत चालक आणि क्लीनरने लागलीच बाहेर पाळल्याने कोणीही जखमी झाले नाही.ट्रकच्या सोकेटमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज असून नाशिक अग्निशामक दलाच्या बंब वेळीच पोहचत त्यांनी आग आटोक्यात आणली. या आगीमुळे उड्डाणपुलावरील मुंबईकडे जाणारी वाहने थांबविण्यात आली होती. इंदिरा नगर जवळील उड्डाणपुलावर जाण्यासाठीचा मार्ग बंद करण्यात आला होता.