शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 जून 2019 (11:20 IST)

बागेतून लहान मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न, नागरिकांची जागरुकता परप्रांतीयाला पकडले

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीत हाय प्रोफाईल कॉम्प्लेक्सच्या गार्डनमध्ये खेळत असलेल्या 6 वर्षाच्या मुलीला पळवून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हा विहारी असून जितेंद्र साहनी त्याचे नाव आहे. अजून किती लोक त्याच्या सोबत आहेत याचा तपास पोलिस करत आहेत. या घटनेमुळे डोंबिवलीमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
 
डोंबिवली पूर्वेतील कासारिओ कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली असून, परिसरातील बगीचात काही लहान मुलं, मुली खेळत होते. सुमारे रात्री साडे आठच्या सुमारास अनोळखी इसम या ठिकाणी आला होता. त्याने खेळत असलेल्या 6 वर्षांच्या मुलीला आपल्या हातात घेतलं होते. पण मुलीच्या मोठ्या बहिणीची नजर त्याच्यावर पडली होती, नंतर  मुलीने आरडा ओरडा केल्यानंतर स्थानिक रहिवासी गोळा झाले आणि त्यांनी मुलगी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीला पकडून चोप देत मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिल आहे. त्यामुळे पालकांनी आता लहान मुलांकडे लक्ष देण्याचे गरजेचे आहे.