मुंढे यांनी परिवहन महामंडळ अध्यक्षपदचा कार्यभार स्वीकारला
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अखेर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. वाद-विवाद टाळून काम करण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाचा पदभार स्वीकारल्यानंतर दिली. कंपनीच्या सगळ्या डायरेक्टर्ससोबत सामंजस्याने कारभार करून, पीएमपीएमएलच्या वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितलं.