रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी
रांची : रांची मध्ये शाळकरी मुलांचा बसला अपघात झाला असून या बस मध्ये 30 मुले होती. या घटने नंतर बसचा ड्राइव्हर फरार झाला असून पोलीस तपास करीत आहे.
झारखंडची राजधानी रांची मध्ये एक भयंकर अपघात घडला आहे. आज रांची उपखंडच्या मंदार सीडी ब्लॉक मध्ये एक शाळेची बस पालटली आहे. या बसमध्ये 30 विद्यार्थी होते त्यातील कमीतकमी 15 विद्यार्थी जखमी झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 शाळकरी मुलांनी भरलेली बस मंदार सेंट मारिया स्कुल मधून कमीतकमी 100 मीटर दूर एक वळणावर पलटली. तसेच या असच अपघात झाल्यानंतर ड्राइव्हर पळून गेला. बस मधील मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात काही मुलांना खोल जखमा झाल्यात. काही मुलांना गंभीर दुखापत झाली असून सिटी स्कॅन केला जात आहे. तसेच इतर मुलं ठीक आहेत. या अपघाताचे कारण स्पष्ट होण्यासाठी पोलीस तपस करीत आहे.
तसेच एका मुलाच्या पालकांनी ड्राइव्हर वर आरोप लावले आहेत, ड्राइव्हर गतीने बस चालवत होता तसेच मोबाईलवर बोलत होता. व सांगितले की, आज बस 45 मिनिट लेट होती. ही वेळ भरून काढण्यासाठी ड्राइव्हर जलद गतीने बस चालवत होता. व स चावताना तो फोनवर बोलत होता. तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ड्राइव्हर पळून गेला आहे आणि त्याचा शोध सुरु आहे.
Edited By- Dhanashri Naik