रविवार, 22 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 2 जानेवारी 2023 (22:19 IST)

रील बनवणाऱ्या दोन मित्रांना ट्रेनची धडक, तिसऱ्या मित्राने पुलावरून उडी मारून जीव वाचवला

सध्या सोशल मीडियावर रिल्स बनवण्याचा छन्द लागला आहे. जो पहा तो रिल्स बनवून सोशल मीडियावर अपलोड करत आहे. 15 मिनिटाची रिल्स बनवणे दोन तरुणांना महागात पडले.बिहारमधील कटिहारमध्ये रील बनवण्याच्या छंदाने दोन तरुणांचा जीव घेतला. गुरुवारी दोघे मित्र रेल्वे ट्रॅकवर 'जो फिसल जाऊं मैं वो दीवाना नही' या गाण्यावर रिल तयार करत होते. तेवढ्यात मागून येणाऱ्या ट्रेनच्या तावडीत सापडले आणि त्यांचा मृत्यू झाला. ही घटना बारसोई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लहगरिया पंचायतीजवळ घडली.
 
बिहारमधील खगरिया येथे रेल्वे पुलावर रील बनवणाऱ्या दोन मित्रांचा रेल्वेची धडक बसून मृत्यू झाला. तिसऱ्या मित्राने रेल्वे पुलावरून कोरड्या नदीपात्रात उडी मारून जीव वाचवला. तो गंभीर जखमी झाला. अमन असे या तरुणाचं नाव आहे. हा अपघात 1जानेवारी रोजी झाला होता. तिघांचेही वय 16 ते 19 दरम्यान आहे. 
 
अपघातात जखमी झालेल्या अमनने सांगितले की, मी, सोनू आणि नितीश नववर्षाला धामारा घाट स्थानकाजवळील मां कात्यायनी मंदिरात जात होतो. मुख्य रस्त्यावर गर्दी होती. म्हणून आम्ही शॉर्टकट घेतला आणि रेल्वे पुलावरून मंदिराकडे जायला लागलो. दरम्यान, सोनू आणि नितीशने रील बनवण्यास सुरुवात केली.
 
 त्यांनी एक रिल्स बनवून अपलोड केली. 15 मिनिटांनंतर त्यांनी पुन्हा रील बनवण्यास सुरुवात केली. तेवढ्यात त्याच रुळावर दुसऱ्या बाजूने ट्रेन आली. धुक्यामुळे ट्रेन दिसली नाही. सोनू आणि नितीश यांना धडक देत ट्रेन निघाली. मी दूर होतो. ट्रेन पाहून पुलावरून उडी मारली.या अपघातात सोनू आणि नितेश दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला. सोनू हा एकुलता एक मुलगा होता. मुलाच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर सोनूची आई चंदनदेवी यांची प्रकृतीही बिघडली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नितीश आणि सोनू जानकी एक्स्प्रेसच्या तावडीत आले.त्यांचे मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Edited By - Priya Dixit