1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Two STs collided head-on in Dapoli of Ratnagiri district

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये दोन एसटींची समोरासमोर धडक

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये आज सकाळी दोन एसटींची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात 25 प्रवासी जखमी झालेत. तर एक बस चालक गंभीर जखमी झालाय.
 
एका एसटीचे स्टेअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती येत आहे. दरम्यान आज सकाळी विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी एसटीने प्रवास करत होते. दापोली येथे दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात विद्यार्थी आणि महिला प्रवासी जखमी झालेत. 
 
दापोलीकडून मुरतपूरकडे जाणाऱ्या तर बोरिवली - दापोली एसटी दापोलीकडे येत असताना मौजे दापोली वळणावर समोरासमोर धडक झाली. या धडकामुळे बोरवली - दापोली एसटीचा चालक गंभीर जखमी झाला आहे. या सर्व जखमींना सरकारी रुग्णालयात तात्काळ हलविण्यात आले. दापोली उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 
पुढील लेख
मुंबईत शिवसेनेविरोधात भाजप-काँग्रेस एकत्र, शिंदे सरकारकडे सीबीआय चौकशीची मागणी