1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Two truck drivers died in Bhandara

भंडारा येथे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकखाली चिरडल्याने दोन जणांचा मृत्यू

accident
भंडारा येथे राष्ट्रीय महामार्ग ५३ वर टायर बदलत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकखाली चिरडून दोन जण ठार झाले. या अपघातात दोन ट्रक चालकांचा मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील थाना पेट्रोल पंपाजवळ एक भीषण रस्ता अपघात घडला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका नादुरुस्त ट्रकचा टायर बदलत असलेल्या तीन जणांना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने मागून धडक दिली. दोन ट्रक चालकांचा जागीच मृत्यू झाला, तर १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला.
जखमीला जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराज सेवा समितीच्या रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहे. जवाहरनगर पोलिसांनी ट्रक चालक याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  
Edited By- Dhanashri Naik
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
पंतप्रधान मोदींना झालमुरी देणाऱ्या दुकानदाराला सुरक्षा, सीआरपीएफ जवान तैनात