गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 ऑगस्ट 2023 (08:05 IST)

उध्दव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येऊ शकतात- संजय राऊत

मुंबईत शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम सुरु आहे. या स्मारकात बाळासाहेबांच्या अनेक आठवणींच जतन केलं जाणार आहे. या स्मारकासंदर्भात राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
यावेळी बोलताना ते म्हणाले की, ते दोघे भाऊ आहेत.ते कधीही एकत्र येऊ शकतात. यात तिसऱ्याने भाग घेऊ नये. मी दोघांनाही ओळखतो. दोघांशी माझ तितकचं जिव्हाळ्याच नातं आहे.पण राजकीय विषय येतो, तेव्हा मी मनापासून माझे पूर्ण कुटूंब आणि सहकारी कायम बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचेही ते म्हणाले.
 
राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे दोघे ठाकरे कुटुंबाचे वारसदार. दोन्हीच्या सेना वेगवेगळ्या. 2006 साली दोघांच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या.तेव्हापासून हे दोघे एकत्र येणार का?असा प्रश्न राजकीय पटलावर काय़मचा बनला. निवडणुकीच्यावेळी एकत्र येण्याच्या चर्चा होवू लागल्या. कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली.मात्र एकी झाली नाही. परंतु दोन्ही ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मारकाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येतील अशी आशा सर्वांना आहे.


Edited By - Ratnadeep Ranshoor