बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 जून 2022 (21:59 IST)

उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा

uddhav thackeray
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे. काही क्षणांपूर्वीच त्यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या बंडाचा आता दुसरा अंक सुरू होणार आहे.
 
आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून निर्णय सांगताना ते म्हणाले, 'माझ्या सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. विशेषत: शरद पवारांना आणि सोनिया गांधींना.
 
माणसं मोठी झाली. ज्याने मोठं केलं त्यांनाच विसरायला लागली. सत्ता आल्यानंतर सगळं दिलं. ती लोकं नाराज झाली. मी मातोश्रीला आल्यानंतर साधी साधी लोक माझ्याकडे येत आहेत. ज्यांना दिले ते नाराज, ज्यांना दिलं नाही ते सोबत आहे.
 
आज सुद्धा न्यायदेवतेने निकाल दिला आहे. तरीसुद्धा उद्या बहुमत चाचणी करण्याचा आदेश दिला आहे. राज्यपाल महोदयांना ही धन्यवाद द्यायचे आहेत.
 
आम्हाला फ्लोर टेस्ट करायला सांगितली.विधान परिषदेच्या आमदारांची यादीला मंजुरी दिली तर फार बरं होईल
 
काल मी आवाहन केलं. जे नाराज आहे ती नेमकी आहे कोणावर? आपली जी नाराजी आहे ती आपल्या हक्काच्या घरात का सांगितली नाही.? तुमच्या भावनांचा मी आदर करत आलो आहे.
 
ज्यांना आपलं मानलं त्यांच्याशी काय लढाया करायच्या. अनेक सैनिकांना स्थानबद्ध केलं आहे. चीन सीमेवरचं संरक्षण सुद्धा काढून इथे आणण्यात येईल जो गुलाल उधळला तिथे रक्ताचे पाट उधळणार का
 
तुमच्या मार्गात कोणीही येणार नाही. उद्या बहुमत चाचणी आहे. माझ्या बाजूने किती आहे किती विरोधात आहे याने मला फरक पडत नाही
 
मला तो खेळच खेळायचा नाहीये. ज्यांना शिवसेनेने जन्म दिला त्या शिवसेना पुत्राला पदावरून खाली खेचण्याचं पुण्य पदरात पडत असेल तर पडू द्या.
 
मला मुख्यमंत्रीपद सोडण्याची खंत अजिबात नाही. आम्ही अजिबात हपापत नाही. आम्ही सगळं हिंदूसाठी करतो. आज मी सगळ्यांच्या समोर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत आहे."
 
शिवसेना आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मी माझ्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देत आहे.
 
मी शिवसैनिकांना सांगतोय त्यांचा आनंद त्यांना लुटू द्या. शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला सत्तेवरून खेचलं याचे पेढे त्यांना वाटू द्या. त्यांचा गोडवा त्यांना लखलाभ...मला तुमच्या प्रेमाचा गोडवा हवा आहे.
 
सीएए-एनआरसीच्या वेळेस देशभरात दंगली झाल्या. पण महाराष्ट्रात झाल्या नाहीत. मुस्लिम बांधवही सोबत आले. या सगळ्याला कारण तुम्ही आहात. पण हे चांगलंही कोणाला बघवलं नाही. असं ते म्हणाले.