सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 (14:48 IST)

उद्धवजी, तुमचे उरलेले दोन चारजण वाचवा नाही तर शिंदे साहेब तेही घेऊन पळतील : बावनकुळे

Chandrashekhar Bawankule
उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिले आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिलदार नेते आहेत. ते माझे मित्र आहेत. उद्धव ठाकरेही आमचे मित्र होते. ते शरद पवारांच्या नादी लागले. उद्धव ठाकरेंबद्दल एक सांगतो. एक दिवस ते चार लोक पक्षात राहतील. माझे कुटुंब, माझी जबाबदारी अशी त्यांची अवस्था होईल. उद्धवजी, तुमचे उरलेले दोन चारजण वाचवा. नाही तर शिंदे साहेब तेही घेऊन पळतील. त्यामुळे टीका करणे सोडा, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली.
 
यावेळी चंद्रशेखर बावनकुळेंनी यावेळी शिवसेनेच्या जन आक्रोश मोर्चावर टीका केली. शिवसेनेला जन आक्रोश मोर्चा काढण्याचा अधिकार नाही. ते इव्हेंट मॅनेजमेट करत आहेत. अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे पक्षात नाराज नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
 
उद्धव ठाकरे घाबरले आहेत. म्हणून मोठी भाषण सुरू आहेत. त्यामुळेच नाराज असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. उद्धव ठाकरे यांनी विचार करून बोलले पाहिजे. अमित शहा आणि उद्धव ठाकरे म्हणजे सूर्यासमोर दिवा आहे, त्यांचे नाव घेऊन बोलू नये, असा इशाराही त्यांनी दिला.