1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Uncertainty persists over winter session of state legislature

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाबाबत अनिश्‍चिता कायम

Uncertainty
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून होणार की, कोरोनाच्या संसर्गामुळे हिवाळी अधिवेशन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन एकत्र होणार हे अनिश्‍चित आहे. येत्या 2 डिसेंबर रोजी होणार्‍या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. दिवाळीनंतर कोरोनाची लाट किती प्रमाणात येईल हे पाहून 2 तारखेला यासंदर्भात सरकार आणि विरोधी पक्षाचे प्रतिनिधी आपली मते मांडतील, त्यानंतरच अधिवेशनाची तारीख आणि कालावधी निश्‍चित होईल, असे पटोले म्हणाले. 
 
कोरोनाची स्थिती पाहता हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरला नागपूरऐवजी मुंबईमध्ये होईल. या काळात जर कोरोनाची स्थिती नियंत्रणात राहिली, तर अधिवेशन ठरलेल्या दिवसापासून होईल, कमीत कमी दोन आठवडे अधिवेशन होणे स्थितीत अपेक्षित असल्याचे पटोले म्हणाले. 
पुढील लेख
मुंबईतील २९ मॉल्सना अग्निशमन दलाच्यावतीने कारणे दाखवा नोटीस