सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 30 जानेवारी 2023 (09:58 IST)

नदीत बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू,अकोल्याची घटना

water accident
अकोल्यात बाळापूर गावात  नदीपात्रात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मोहम्मद नब्बान मोहम्मद फहीम  (7) आणि दानियाल मोह्हमद फैयाज (9) अशी मृत्युमुखी मुलांची नावे आहेत. 
अकोला जिल्ह्यात बाळापूर येथे मन नदीच्या काठावर वस्ती आहे. लहान मुलं या नदीकाठी खेळत असतात .दोन्ही चिमुकले रविवारी संध्याकाळी नदीकाठी खेळत असताना तोल जाऊन पाय घसरून नदीपात्रात पडले आणि पाण्यात बुडाले अशी शक्यता वर्तवली जात आहे. चिमुकले पाण्यात पडले हे समाजात स्थानिकांनी धाव घेत मुलांना वाचविण्यासाठी उडी घेतली पण त्यांना वाचवता आले नाही. त्यापूर्वीच दोघांचा बुडून मृत्यू झाला. कुटुंबियांना माहिती मिळतातच त्यांनी धाव घेतली.पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मयत मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. बाळापूर पोलिसांनी घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून  नोंद केली आहे. मुलांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. 
 
Edited By- Priya Dixit