शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (07:48 IST)

वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघा युवतींचा जागेवरच दुर्दैवी मृत्यु

death
परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला असताना भिवंडी तालुक्यात पिसे ग्रामपंचायत हद्दीतील चिराडपाडा या आदिवासी वस्ती असलेल्या ठिकाणी वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघा युवतींचा जागेवरच दुर्दैवी मृत्यु झाला तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. शीतल अंकुश वाघे वय १७, योगिता दिनेश वाघे वय २० अशी मयत युवतींची नावे आहेत तर गंभीर जखमी सुगंधा अंकुश वाघे वय ४० यांना पडघा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रथमोपचार करून भिवंडी येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
 
चिराडपाडा या आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या शीतल अंकुश वाघे,योगिता दिनेश वाघे व सुगंधा अंकुश वाघे या सायंकाळी पाऊस नसल्याने जंगलात खेकडे पकडण्यासाठी गेले असता अचानक आकाश ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट करीत पावसाला सुरवात झाली .त्यामध्ये अचानक कडाडलेली वीज कोसळली ती या महिला उभ्या असलेल्या ठिकाणी,त्यामध्ये या तिघी ही गंभीर जखमी होऊन पडल्या.
Edited by : Ratnadeep Ranshoor