शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 सप्टेंबर 2018 (08:55 IST)

यवतमाळ मध्ये दारू तस्करी साठी थेट लक्झरी बसचा वापर

यवतमाळ च्या शहर पोलिसांनी आज महत्वपूर्ण कारवाही केली आहे येथील  निखिल टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीची एक लक्झरी बस मधून थेट लगतच्या दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी केली जात होती त्याचा तस्करांना पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केले आहे.
 
यवतमाळ लगतच्या चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे आणि याच दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात हि थेट ट्रॅव्हल्स भरून दारू तस्करी केली जात होती. यवतमाळ  पांढरकवडा मार्गावरील जुना बायपास जवळ एका डस्टर कंपनीच्या वाहनातून हि अवैध पद्धतीने दारू लक्झरी बस मध्ये साठवणूक केली जात होती याची माहिती यवतमाळ शहर पोलिसांना मिळाली त्यावरून यवतमळ शहर पोलिसांचे बिट मार्शल जगदीश राठोड आणि  दिनेश शुक्ला तिथं पोहचेल आणि तस्करांना रंगेहात पकडले.
 
दरम्यान दोन तस्करांनी तिथे असलेल्या पोलिसांसोबत बाचाबाची करून हुज्जत घातली आणि रेटारेटी करून डस्टर वाहन घेऊन इतर चार साथीदारांसह ते पसार होण्याच्या प्रयत्नात होते दरम्यान तिथे शहर पोलीस स्टेशन चे ठाणेदार विजय राठोड, रवी आडे, गजानन क्षीरसागर, पथकासह घटनास्थळी पोहचेल तिथे दोन आरोपीनचा त्यांनी पाठलाग करून आरोपीला ताब्यात घेतले.
 
या ट्रॅव्हल्स मधून पोलिसांनी 50 ते 60 देशी दारूच्या पेट्या सह मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याच्या पेट्या सुद्धा जप्त केल्या आहेत हा साधारण 1 लाख रुपयांचा अवैध दारू साठा  आणि एक ऍक्टिव्हा सह 40 लाख रुपयांची लक्झरी बस  सुद्धा जप्त पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
 
ज्यावेळी आरोपी पोलिसांसोबत हुज्जत घालत होते त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथकातील पोलीस निरीक्षक उमेश नासरे, भीमराव सिरसाट ,गजानन डोंगरे, किशोर झेंडेकर, महेश पांडे हे सर्व घटनास्थळी पोहचेल होते त्यांना पाहून डस्टर वाहनात बसून साधारण ४ आरोपी तेथून पसार झाले.
 
एखाद्या लक्झरी ट्रॅव्हल्स बस मधून दारू तस्करी केली. जात असल्याची हि मोठी घटना उघडकीस आली आहे त्यामुळे आता यवतमाळ वरून दारूबंदी असलेल्या शेजारील जिल्ह्यात दारू तस्करी होत असल्याचे या घटनेवरून उघडकीस आले आहे त्यामुळे आता या शेजारच्या जिल्ह्यात दारू तस्करी साठी लक्झरी बस चा वापर होत असल्याने आता पोलिसांनी या शेजारच्या जिल्ह्यात जाणाऱ्या ट्रॅव्हल्स वर सुद्धा लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. आता पर्यंत पोलिसांनी 2 लोकांना ताब्यात घेतले त्यांचे इतर साथीदारांचा शोध पोलीस घेत आहे.