गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 डिसेंबर 2023 (21:13 IST)

वीर सावरकर वाद पुन्हा एकदा पेटला, मंत्री प्रियांक खरगे यांनी वीर केले वक्तव्य

savarkar
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला वीर सावरकर वाद पुन्हा एकदा पेटला आहे. कर्नाटकचे माहिती व प्रसारण मंत्री  प्रियांक खरगे यांनी वीर सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. प्रियांक खर्गे म्हणाले की, आपण विधानसभेचा अध्यक्ष असतो तर बेळगाव येथील सुवर्णसौध विधानसभेतून वीर सावरकरांचा फोटो काढून टाकले असते. एवढेच नव्हे तर पुढे ते म्हणाले की, सावरकरांचे योगदान काय? सावरकरांना वीर ही पदवी कशी मिळाली हे भाजपने सांगावे? सावरकरांना वीर ही पदवी कोणी दिली? असे प्रश्न त्यांनी भाजपला विचारले.
 
प्रियांक खर्गे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना ही पक्षाची भूमिका आहे का? असे विचारले असता ते म्हणाले की, सावरकरांचे चित्र विधानसभेत नसावे, असे माझे ठाम मत आहे. भाजपला त्याचा त्रास असेल तर ती त्यांची समस्या आहे. माझे मत आहे की, ज्यांची विचारधारा द्वेष आणि फूट पाडत असेल तर त्यांचा फोटो तिथे नसावा, सावरकरांचे चित्र तेथे नसावे असे माझे मत आहे. पक्षाचे मत आहे की, नाही मला माहिती नाही असेही स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.