रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2023 (12:15 IST)

Wadala :महिलेचा तीन तुकडे केलेला मृतदेह आढळला

murder
मुंबईच्या वडाळा परिसरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वडाळा परिसरात एका ट्रकच्या मागे अज्ञात महिलेचा अर्धवटअवस्थेत जळालेला मृतदेह आढळून आला असून या महिलेच्या मृतदेहाचे तीन तुकडे केले होते. 
महिलेचा मृतदेह मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ट्रॅक पेट्रोलिंग कर्मचाऱ्यांना वडाळा परिसरात एका पिशवी मध्ये जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. याची माहिती वडाळा पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठवले असता अज्ञात आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हा मृतदेह तीन तुकड्यात आढळला असून पोलिसांना डोकं धड आणि एक पाय पोलिसांना आढळला आहे. महिलेचे वय साधारणपणे 30 वर्ष ते 40 वर्ष असू शकते. महिलेच्या हत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही. महिलेची हत्या एक ते दोन दिवसांपूर्वी केली गेली असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महिलेचा मृतदेह एका पिशवी मध्ये आढळला आहे. पोलिसांना संशयास्पद पिशवी आढळून आली त्याला उघडून बघता त्यात जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला.पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
 


Edited by - Priya Dixit