बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 जून 2021 (07:55 IST)

शनिवार, रविवारी विदर्भात अतिवृष्टीचा इशारा

विदर्भात तीन दिवस आधीच मान्सून दाखल झालाय. शनिवार, रविवारी विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. गोंदिया, भंडारा, गडचिरोलीमध्ये अतिवृष्टीचा अंदाज असून नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वर्ध्याच्या काही भागातही मोठा पाऊस होऊ शकतो. 
 
दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील तिवसा, चांदुर रेल्वे, वरुड, मोर्शी, चिखलदरा, मेळघाट भागामध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीसाठीची लगबग वाढली आहे. चांदुर रेल्वेत ही मुसळधार पावसामुळे गाडगेबाबा मार्केट परिसरात मोठया प्रमाणात पाणी साचलं. 
 
भंडारा जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसानं दमदार हजेरी लावलीये., मागील आठवड्याभरापासून उकाळ्यापासून नागरिक हैराण झाले होते.. त्यामुळे पावसानं नागरिकाना दिलासा मिळालाय. पाऊस वेळेवर आल्यानं शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आलाय
 
यवतमाळ जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस बरसल्याने शेतीकामांसह जनजीवन विस्कळीत झाले आहे. यंदा मान्सूनपूर्व पावसाने चांगलाच जोर धरला त्यामुळे शेतकऱ्यांनी हाती घेतलेली मशागतीसह अन्य शेतीकामे प्रभावित झाली आहे.