गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 जुलै 2022 (21:48 IST)

वायगाव हळद आता भारतीय टपालावर

haldi
वर्धा जिल्ह्याचे पीक वैशिष्ट्य असलेली समुद्रपूर तालुक्यातील वायगाव हळद आता भारतीय टपालावर उमटली आहे. वायगावच्या हळदीला समुद्रपूर तालुक्यात बचत गटांच्या माध्यमातून झळाळी देण्याचा प्रयत्न होत आहे. सहा महिन्यांत तब्बल 60 लाखांची उलाढाल हे बचत गट करतात. समुद्रपूर तालुक्यात ७०० मेट्रिक टन इतके हळदीचे उत्पादन होते.  वायगाव हळद ही जगप्रसिद्ध आहे. आता पोस्टाच्या लिफाफ्यावर वायगाव हळदचा नाव आणि फोटो टाकला आहे.
 
फार्मर प्रोड्युसर कंपनी, डी आर डी ए, आत्मा व बचत गटांनी भारतीय डाक विभागाच्या सहकार्याने टपालाच्या माध्यमातून वायगगावची हळद सातासमुद्रापार पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. वायगाव हळदीचे गुणधर्म ओळखून आधीच वायगाव हळदीला भौगोलिक नामांकन मिळवून घेतले आहे. 
 
भारत सरकार द्वारा भौगोलिक उपदर्शन रजिस्ट्री मध्ये वायगांव हळद या उत्पादनासाठी वायगांव हळद उत्पादक संघ, समुद्रपुर भौगोलिक उपदर्शन संख्या क्रं. 471 म्हणजेच जी.आई. टैग प्राप्त झालेला आहे. 
 
'अतुल्य भारत की अमुल्य निधी' ही संकल्पना भारतीय डाक खात्याकडून राबविली जात आहे. या अंतर्गत ज्या ज्या भागात जे जे वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन असेल त्याची प्रसिद्धी टपाल तिकिटांच्या माध्यमातून केली जाते. वायगाव येथील हळद उतपादन देखील टपाल तिकिटावर उमटले आहे. याशिवाय हे उत्पादन कसे वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे याची माहिती देखील दिली आहे. वायगाव हळदीचे चित्र टपालावर एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला हळदीची गुणधर्म तसेच इतर महत्वपूर्ण माहिती नोंद करण्यात आली आहे.