आरपीएफ जवानाच्या सतर्कतेने वाचला तरुणाचा जीव

Last Modified सोमवार, 20 जून 2022 (18:20 IST)
प्रवाशांनी चालत्या रेल्वेतून चढू किंवा उतरू नये. असे आवाहन आणि सूचना वारंवार रेल्वे कडून देण्यात येतात तरी ही आपला जीव धोक्यात घालत काही बेजबाबदार प्रवाशी चालत्या रेल्वेतून चढ उतर करतात. काहींचे नशीब बलवत्तर असतात की ते रेल्वेत चढताना किंवा उतरताना पडल्यावर वाचतात. पण सर्वांचे नशीब बलवत्तर नसते. आणि अशा परिस्थितीत काही जणांना आपले प्राण गमवावे लागतात.
अशा घटना घडल्यावर देखील काही जण आपला जीव धोक्यात टाकून चालत्या रेल्वेतून चढतात किंवा उतरतात.
धावत्या ट्रेनला पकडण्याच्या प्रयत्न करताना एका तरुणाचा जीव आरपीएफ जवानाचा सतर्कतेमुळे वाचला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. तरुणाचे प्राण वाचविल्याबाबद्दल आरपीएफ जवानाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. ही संपूर्ण घटना आहे वर्धाच्या रेल्वे स्थानक फलाट क्रमांक 2 वर ची.

एक 26 वर्षाचा नितीन नावाचा तरुण वर्धा रेल्वे स्थानकावर अकोल्याला जाणारी सुपरफास्ट ट्रेनची वाट पाहत उभा होता. ट्रेन आली आणि तरुण त्याला पकडण्यासाठी धावला आणि धावत धावत ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात फलाट आणि रेल्वेच्या मध्ये पाय घसरून पडला आणि अडकला. हे दृश्य पाहून इतर प्रवाशी घाबरले आणि गोंधळून गेले. या तरुणाला ट्रेनच्या मध्ये अडकलेलं पाहून आरपीएफ जवान भागवत बाजड हे देवासारखे आले आणि त्यांनी तातडीने आपल्या जीवाची पर्वा न करता या तरुणाला आपल्या दिशेने ओढले आणि त्याचे प्राण वाचवले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून. भागवत बाजड यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.यावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

Sini शेट्टी मिस इंडिया 2022 बनली

Sini शेट्टी मिस इंडिया 2022 बनली
VLCC ने 'फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2022' सादर केला, ज्यातील विजेत्याची रविवारी रात्री ...

माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ईडीचे समन्स

माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ईडीचे समन्स
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ईडीने समन्स बजावले आहे. पांडे यांना ईडी ने ५ ...

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी
स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे नाव नरेंद्र ...

'आरे’चा विरोध प्रायोजित : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'आरे’चा विरोध  प्रायोजित : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विधीमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवणीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते ...

.शिवसेना-शिंदे गटाची परस्परविरोधात तक्रार

.शिवसेना-शिंदे गटाची परस्परविरोधात तक्रार
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली आहे. पण, शिवसेनेनं व्हीप बजावला होता. तो व्हीप ...