बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 डिसेंबर 2020 (16:48 IST)

तीन पक्षांची 'पॉवर' जोखण्यात कमी पडलो : फडणवीस

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपाला त्यांच्या बालेकिल्ल्यांमध्ये जोरदार धक्का देत विजयश्री खेचून आणली आहे. आहे. विधान परिषदेच्या सहा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी दोन, भाजपा 1 आणि अपक्ष 1 असे चित्र आहे. भाजपाला या निवडणुकीत जोरदार फटका बसला असून नागपूर आणि पुणे हे पारंपरिक मतदारसंघ गमवावे लागले आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी दिली आहे.
 
"तीन पक्षांची 'पॉवर' जोखण्यात कमी पडलो" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. "विधानपरिषदेचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला आहे. आम्हाला चांगल्या जागांची अपेक्षा होती पण एकच जागा मिळाली. या निकालाचं विश्लेषण करायचं झालं तर भाजपा नेते-कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली होती. मात्र आमच्या स्ट्रॅटेजीत चूक झाली असेल. तसेच तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांची 'पॉवर' किती असेल याबाबतचं आमचं आकलन चुकलं" असं देखील फडणवीस म्हणाले.