शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (15:57 IST)

काय म्हणता, अजित पवार-हर्षवर्धन पाटील यांची वीस-बावीस मिनिटे चर्चा !

ajit panwar harshwardhan patil
पुणे जिल्ह्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र आले होते. पुणे जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षांच्या मुलाच्या लग्नसमारंभात हे दोन्ही नेते एकत्र आले होते. या लग्नसमारंभात उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषडेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजप प्रदशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. राजकारणातील विळ्या भोपळ्याचे वैर असणारे व पक्के शेजारी, पक्के वैरी म्हणून महाराष्ट्रात सर्वदूर परिचयाचे असणारे अजित पवार व हर्षवर्धन पाटील हे एकत्र एकाच कार्यक्रमात आल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्यात जवळपास वीस ते बावीस मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे.
 
राष्ट्रवादीचे अजित पवार व एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेले हर्षवर्धन पाटील यांनी आघाडीच्या सरकारमध्ये १५ वर्षे एकत्र काम केले. मात्र, दोघांच्यात राजकीय वैर होते. हर्षवर्धन पाटील यांचे सातत्याने खच्चीकरण करण्याचा अजित पवार यांचा नेहमीच प्रयत्न असे. हर्षवर्धन पाटील यांच्या राजकारणाला अजित पवार यांनीच खऱ्या अर्थाने सुरुंग लावला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा विरोध असतानाही दत्तात्रय भरणे यांना २००९ साली बंडखोरी करण्यास भाग पाडले. या नंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना दोन वेळा विधानसभेला विजयी करण्यामध्ये अजित पवारांचा मोठा सिंहाचा वाटा आहे, एकेकाळी आघाडी सरकार मध्ये काँग्रेस पक्षाचे वजनदार नेते म्हणून असलेले हर्षवर्धन पाटील यांना दोन वेळा घरचा रस्ता दाखविण्यात अजित पवार यशस्वी ठरले आहे, हर्षवर्धन पाटील यांनीदेखील मी थेट अजित पवारांचा विरोधक असल्याचा जाहीर कार्यक्रमांमधून अनेक वेळा सांगितलेल आहे.