सोमवार, 28 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified गुरूवार, 3 जून 2021 (08:18 IST)

संजय राऊतांबद्दल रोज काय बोलायचं?; फडणवीसांनी फटकारले

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांना फटकारले आहे. संजय राऊत एवढे थोडेच महत्त्वाचे आहेत. त्यांच्याबद्दल मी काय बोलायचं?, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर टीका केली आहे.
 
देवेंद्र फडणवीस परभणीच्या दौऱ्यावर आहेत. परभणीत त्यांनी आरोग्य सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोना परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा, मी कालच राऊतांबद्दल बोललो आहे. त्यांच्याबद्दल मी रोज रोज काय बोलावं. ते एवढे थोडीच महत्त्वाचे आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली.
 
शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसल्याबद्दलही त्यांनी सरकारवर टीका केली. पीक विमा आणि केंद्र सरकारचा काहीच संबंध नाही. राज्य सरकारने टेंडर उशिरा काढले. तसेच पीक विम्याचे नियम बदलले. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. आमचे सरकार असताना शेतकऱ्यांना वेळेवर पैसे दिले जात होते. गेल्या वर्षापासून शेतकऱ्यांना पीक विभ्याचा लाभ मिळत नाहीये, असं ते म्हणाले.