शुक्रवार, 27 जानेवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified बुधवार, 2 जून 2021 (13:37 IST)

Gold Price Today: सोन्यासह चांदीच्या किंमतीत पुन्हा एकदा प्रचंड वाढ

सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा प्रचंड वाढ झाली आहे.  माहितीनुसार, दोन जून, बुधवारी सोन्याच्या दरांमध्ये प्रतितोळा जवळपास 200 रुपयांनी वाढ झाली आहे. 22 कॅरेटच्या सोन्याची किंमत प्रति एक ग्रॅम 20 रुपयांनी वाढून 4,690 इतकी झाली आहे. मंगळवारी सोनं प्रति एक ग्रॅम 4,670 रुपये झालं होतं.
  
मंगळवारी सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 447 रुपयांची वाढ झाली. या वाढीनंतर सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 49422 रुपये झाला. यापूर्वी सोमवारी सोन्याच्या दर 10 ग्रॅम 48,975 रुपयांवर बंद झाले होते. मंगळवारी 23 कॅरेट सोनं 49224 रुपयांवर, 22 कॅरेट सोन्याचे 45271 रुपयांवर, 18 कॅरेट सोन्याचे 37067 रुपये आणि 14 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम 28912 रुपये झाले.
 
सोन्यासह चांदीच्या भावातही मंगळवारी वाढ नोंदली गेली. चांदीच्या किंमतीत 1058 रुपयांची वाढ झाली. या वाढानंतर चांदीचा दर प्रतिकिलो 72428 रुपये झाला. यापूर्वी सोमवारी चांदीचा दर प्रति किलो 71370 रुपये होता.