संबंधित माहिती
- नितीश कुमारांनी दिली महाराष्ट्राच्या सुपुत्र अनिल हेगडे यांना उमेदवारी
- राज्यसभेचे महाराष्ट्रातील उमेदवार ठरले; बघा, कुठल्या पक्षाचे कोण आहेत उमेदवार?
- UPSCचा निकाल जाहीर! महाराष्ट्रातील ६० हून अधिक उमेदवारांना घवघवीत यश; महिलांनी मारली बाजी
- येत्या १५ ऑगस्ट पासून एक रुपयामध्ये १० सॅनिटरी नॅपकीन महाराष्ट्र शासनाचा निर्णय
- केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात लवकरच धडकणार
महाराष्ट्रात पाऊस कधी?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सून महाराष्ट्रात 10 जूनला दाखल होईल, तर पुढच्या दोन दिवसांत कोकणमार्गे मुंबईत मान्सूनपूर्व सरी कोसळतील. 15 दिवसांपूर्वी बंगालच्या खाडीवर चक्रीवादळ घोंघावले होते. त्याआधारे हवामान खात्याने मान्सूनच्या आगमनाची भविष्यवाणी केली होती. मात्र मागील काही दिवस नैऋत्य मान्सूनने हुलकावणी दिली. अखेर रविवारी त्याने केरळमध्ये जोरदार एंट्री मारली. 1 जूनपर्यंत केरळात मान्सून धो धो कोसळणार असल्याचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मान्सूनपूर्व पावसाचे वातावरण तयार झाले आहे. महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत मान्सून पोहोचेल नंतर 15 जूनपर्यंत मध्यप्रदेशात धडकेल असा अंदाज हवामान खात्याने लावला आहे.
