बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 जून 2022 (19:11 IST)

दहावीचा निकाल कधी ? पालक आणि विद्यार्थी निकालासाठी उत्सुक

Maharashtra SSC Board Result 2022 :  गेल्या आठवड्यात HSC बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. आता दहावीचा निकाल कधी येणार या बाबत दहावीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड एज्युकेशन लवकरच दहावी बोर्डाचे निकाल जाहीर करण्याचे सांगण्यात येत आहे. 
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 20 जून पर्यंत जाहीर केला जाण्याचे सांगितलं होतं. यंदा बारावीचा निकाल 8 जून रोजी जाहीर झाला. दहावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने 15 मार्च ते 4 एप्रिल घेण्यात आली होती.  20 जूनपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होण्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितले आहे. आता निकालाची विद्यार्थी आणि पालक उत्सुकतेने वाट पाहत आहे.