बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021 (15:22 IST)

पाऊस कधी थांबणार? IMD ने दिली महत्त्वाची माहिती

यंदा नैऋत्य मान्सून वाऱ्यांसह पडणाऱ्या पावसाच्या हंगामात चांगला पाऊस झाल्याचे भारतीय हवामान खात्याने (IMD) म्हटले आहे. 1 जूनला या पावसाला सुरुवात होऊन जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात सर्वसाधारण सरासरीच्या 99 टक्के पाऊस झाला आहे. आता परतीच्या मान्सून विषयी हवामान विभाग दिल्लीचे तज्ज्ञ के.एस. होसळीकर यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.मान्सूनचा परतीचा प्रवास  वाव्य भारतातील काही भागांतून येत्या 6 ऑक्टोबरला सुरु होणार आहे. त्यामुळे होणाऱ्या परतीच्या पावसाविषयी 4 आठवड्यांचा अंदाज व्यक्त केला आहे.
पहिल्या आठवड्यात देशाच्या पश्चिम, वायव्य ( या भागाच्या आजूबाजूच्या मध्य भारतातील बहुतेक प्रदेशामध्ये सर्वसाधारण प्रमाणाहून अधिक पावसाची शक्यता आहे.
दुसऱ्या आठवड्यात देशाच्या मध्य भागातील राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण सर्वसाधारण प्रमाणाहून जास्त राहील. तर वायव्य भागात हे प्रमाण सर्वसाधारण असेल. यानंतर देशातील वायव्य प्रदेशातील पावसाचं प्रमाण कमी होत जाईल.
 
तिसऱ्या आठवड्यात देशाच्या पूर्व भागात पाऊस सुरु राहण्याची शक्यता आहे.चौथ्या आठवड्यात देशातील बहुतेक ठिकाणचा पाऊस सर्वसाधारण प्रमाणाहून कमी होईल.यंदाचा मान्सून  हंगाम 1 जूनला सुरु झाला असून 30 सप्टेंबरला संपत आहे.या हंगामात वायव्य भागात 96 टक्के, मध्य भागात 104 टक्के, पूर्व आणि ईशान्य भागांत 88 टक्के तर दक्षिणेत 111 टक्के असं विभागनिहाय पावसाचं प्रमाण राहिलं आहे.