बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019 (16:42 IST)

सगळे लपून-छपून का : फडणवीस

महाराष्ट्र विकासआघाडी सरकारवर पहिल्या दिवसांपासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. आता दुसऱ्या दिवशीही फडणवीस यांनी टीका केली आहे. सगळे लपून-छपून का करण्यात येत आहे, असा सवाल उपस्थित केला आहे.
 
भाजपने विरोधी पक्षात बसण्याची घोषणा केली असताना आणि महाराष्ट्र विकासआघाडीने निरनिराळ्या प्रकारे बहुमताचे प्रदर्शन आणि दावे केले असताना ही लपवा-छपवी आणि भीती का? महाराष्ट्राला याचे उत्तर हवे आहे. या सरकारकडे बहुमत असेल तर लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का घेतला आहे. नियमबाह्य पद्धतीने हंगामी अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी, असे विचारत स्वत:च्या आमदारांवर अजूनही इतका अविश्वास का?, अजूनही त्यांना डांबून ठेवण्याची शिक्षा का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.