गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 ऑगस्ट 2019 (10:15 IST)

केंद्रीय पथक येणार, पूरग्रस्त जिल्ह्यांची पाहणी करणार

महाराष्ट्रातील पूरग्रस्त जिल्ह्यांच्या दौरा करण्यासाठी आज केंद्रीय पथक राज्यात दाखल होणार आहे. केंद्राचे हे पथक कोल्हापूर, सांगलीसह इतर जिल्ह्यांचा दौरा करुन झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहे. केंद्राच्या या पथकामध्ये सात सदस्य असतील. यंदा झालेल्या भीषण पूरपरिस्थितीनंतर राज्य सरकारने ६,८१३ कोटींच्या मदतीचा केंद्राला प्रस्ताव पाठवला होता. आता केंद्र सरकारचं हे पथक पाहणीनंतर अहवाल देणार आहे . 
 
सातारा, सांगलीमध्ये पूर आला. या ऑगस्ट महिन्याच्या १० दिवसात तब्बल ३ हजार मिलीमीटर पाऊस एवढ्या प्रचंड पावसाची नोंद महाबळेश्वर भागात झाली. तर जुलै आणि ऑगस्ट या पंधरा दिवसात म्हणजेच अवघ्या दीड महिन्यात ६ हजार मिलीमीटर पावसाची नोंद महाबळेश्वरच्या भारतीय हवामान विभागात झाली आहे. तसेच कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे सांगलीत पूरस्थिती निर्माण झाली. तसेच अल्लमटी धरणातून पाण्याचा विसर्ग न केल्यामुळे कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर झाली होती.