शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 5 जून 2022 (16:44 IST)

शाळा पुन्हा बंद होणार का ? शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या ...

varsha gayakwad
सध्या देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यावर जनतेला दिलासा मिळाला होता. आता पुन्हा देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात सातत्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येत सकारात्मक वाढ होत आहे.सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णाचा आकडा हजाराच्या वर गेला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना मास्क लावण्याचे आणि सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन केले आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्या पाहून जून मध्ये शाळा वेळेवर सुरु होणार की राज्यात कोरोनाचे निर्बंध लावून शाळा पुन्हा बंद होणार असा प्रश्न उद्भवत आहे.

या संदर्भात शाळांबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे की शाळांबाबत एसओपी तयार करण्यात येण्याचं त्यांनी सांगितले शाळा देखील मुलांच्या आरोग्याची काळजी घेऊन सुरु करण्यात येतील. विद्यार्थ्यांचं काहीही नुकसान होऊ देणार नाही. सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. या बाबत आम्ही आरोग्य विभागाचा सल्ला घेऊनच शाळेचा एसओपी करून तशी पाऊले घेण्यात येतील. गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुलांचं शैक्षणिक नुकसान झालं आहे. मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये या साठी सर्वोपरी व्यवस्थित काळजी घेऊन शाळा सुरु करण्याचं त्यांनी सांगितलं.