रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जुलै 2017 (09:24 IST)

महिलांना मासिक पाळीची रजा

मुंबईमधील  कल्चर मीडिया या कंपनीने मासिक पाळीची रजा सुरू केलीय. अशा प्रकारची रजा देणारी ती कदाचित भारतातील पहिलीच कंपनी असेल. ही कंपनी युट्यूब चॅनेल चालवते. या कंपनीत 75 महिला कर्मचारी काम करतात. तेव्हा मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी रजा देण्याचं नवं धोरण या कंपनीने सुरू केलं आहे. मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी त्रास जास्त होते तेव्हा त्यांना रजा देण्याचं कंपनीनं ठरवलं आहे.

डोनेशिया, दक्षिण कोरिया, तैवान आणइ इटालीमध्ये स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात तीन दिवसांची भरपगारी रजा देण्यात येते. दक्षिण कोरियामध्ये तर ज्या महिला ही रजा घेणार नाहीत त्यांना अतिरिक्त वेतन मिळण्याचीही तरतूद आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील एका मिडियाबेस कंपनीने मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी पगारी रजा देण्याचा निर्णय घेतला आहे. एक जुलैपासून तो लागूही करण्यात आला आहे.