शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022 (12:18 IST)

कोल्हापुरात कुस्तीचा सराव करताना पैलवानाचा मृत्यू

कोल्हापुरातील पंढरपूरच्या वाखरी येथील मारुती सुरवसे या 23 वर्षीय पैलवानाचा कुस्तीचा सराव करताना मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मारुतीचे वडील शेतीचे काम करतात पण मारुतीला लहानपणापासूनच कुस्तीचे वेड होते. त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला कुस्तीमध्ये करियर करण्यासाठी कोल्हापुर येथे सरावासाठी पाठवले होते. 
 
मारुती हा मागील काही वर्षांपासून कोल्हापुरातील तालमीत कुस्तीचा सराव करत होता. रोजप्रमाणे तो रात्री सराव करून घरी आला व अंघोळ करत असताना त्याच्या छातीत अचानक दुखू लागले तर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.  

Edited by : Smita Joshi 
कोल्हापुरा