मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :यवतमाळ , रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (18:11 IST)

यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणुकीमध्ये 21 वर्षांनी सत्ता परिवर्तन ; 21 जागावर दणदणीत विजयी

yavatmal jilha parishad
विदर्भातील नामांकित तसेच कोट्यावधी आर्थिक उलाढाल असलेल्या यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणुकीमध्ये सहकार पॅनलचा  दारुण पराभव झाला आहे .सहकार पॅनल चे विमान कोसळल्याने अनेकांना हादरा बसला आहे
21 वर्षांपासून राजुदास जाधव यांचे वर्चस्व व सत्ता या जिल्हा परिषद पतसंस्थे वर होती त्याच सहकार पॅनल आकाशातील विमान आज कोसळले. या निवडणुकीत परिवर्तन पॅनल चे 21  जागावर सर्वच उमेदवार विजयी झाले आहेत
विशेष म्हणजे माजी वनमंत्री तथा शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांचे खंदे समर्थक असलेले राजुदास जाधव यांच्या गटाला हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय .सहकार पॅनलचे प्रमुख राजुदास जाधव यांचा परिवर्तन पॅनल चे संयोजक पप्पू पाटील भोयर यांनी 904 मतांनी पराभव केला आहे तर परिवर्तन पॅनल चे मधुकर काठोडे यांना  3223 मते मिळाली त्यांच्या पॅनल चा हा सर्वांत मोठा विजय मानला जातोय .राजुदास जाधव हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुध्दा आहेत . सहकार पॅनल पराभव कशामुळे झाला याची चर्चा आज जिल्हा परिषदेच्या परिसरात रंगली होती .
 
निवडूण आलेले 21 संचालक
मधूकर काठोळे : 3223
पोपेश्वर भोयर : 3778
संजय गावंडे : 3112
प्रदीप मोहटे  : 3187
संजय बिहाडे  : 3163
मुकेश भोयर  : 3012
सुभाष धवसे  : 3010
गजानन पोयाम  : 3008
तुलसीदास आत्राम : 2945
विनोदकुमार कदम : 2940
शरद घारोड : 2986
अशोक चटप  : 2893
विलास टोंगे  : 2989
सचिन ठाकरे  : 2986
तेजस तिवारी  : 2929
नदिम पटेल  : 2931
स्वप्नील फुलमाळी  : 2955
महेश सोनेकर  : 2868
अभिजीत ठाकरे : 2979
सुनीता गुघाणे  : 2994
विजया राऊत  : 2991