शनिवार, 16 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 ऑगस्ट 2016 (10:42 IST)

मोनोरेल अडकली; प्रवासी लटकले!

वडाळा-चेंबूर दरम्यान सकाळी साडेसहा पासून मोनोरेलची वाहतूक बंद आहे. तांत्रिक बिघडामुळे अडकलेल्या पहिल्या मोनोरेलला काढण्यासाठी आलेली दुसरी मोनोरेलही अडकली आहे.

सकाळी 6 वाजताच्या सुमाराला भक्तीपार्कजवळ एक मोनोरेल अडकली आणि ती काढायला दुसरी मोनोरेल आली. मात्र, दुसरीही मोनोरेल अडकली. सकाळी 6 वाजल्यापासून दोन्ही मोनोरेल अडकल्या असून, दुरुस्तीचं काम अद्यापही सुरु आहे. गेल्या दोन तासापासून प्रवासी लटकले आहेत. मोनोरेलचे तंत्रज्ञ घटनास्थळी दाखल झाले असून हा बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

दीड वर्षापूर्वीही मोनोरेल अशीच मध्येच अडकून पडली होती. त्यावेळी प्रवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले होते. वारंवार होणा-या बिघाडामुळे मुंबईची लोकलसेवा सातत्याने कोलमडत असताना आता मोनोरेलचाही त्याच मार्गाने प्रवास सुरु झाला आहे. अत्याधुनिक प्रवासासाठी ओळखल्या जाणा-या मोनोरेलमध्ये बिघाड झाल्याने दोन तासांपासून मोनोरेलची वाहतूक ठप्प झाली आहे.