प्रत्येक प्रसंगासाठी उपयोगी नवऱ्याला/बायकोला सरप्राईज गिफ्ट देण्यासाठी सर्वोत्तम आयडियाज
तुमच्या पतीला खास वाटणे हा प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. जरी वेळोवेळी असे व्यक्त करून तुम्ही नात्यात नवीनता आणि ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी पती किंवा पत्नीला गिफ्ट देऊन नात्यात नवीनता आणू शकता. पती किंवा पत्नीचा वाढदिवस असो किंवा लग्नाची वर्षगाठ असो. सरप्राईज प्लॅन करून नात्यात नवीनता आणू शकता.
सरप्राईज गिफ्ट देण्यापूर्वी पती किंवा पत्नीला कोणत्या प्रकारच्या गोष्टी आवडतात हे लक्षात ठेवा, जसे की रोमँटिक, मजेदार किंवा भावनिक. त्यांच्या मनःस्थिती आणि स्वभावानुसार नियोजन करणे चांगले राहील.
या साठी आम्ही काही गिफ्ट आयडियाज सांगत आहोत चला जाणून घेऊ या.
हाताने बनवलेली भेट द्या
पती किंवा पत्नीने काही प्रेमळ गोष्टींचा उल्लेख करून हाताने बनवलेली भेट किंवा पत्र लिहा. किंवा तुमच्या दोघांच्या आठवणींचा अल्बम तयार करू शकता. स्वतःच्या हाताने बनवलेले ग्रीटिंग कार्ड बेड जवळ ठेऊ शकता.एक प्रेम पत्र ज्या मध्ये तुम्ही त्यांना किंवा तिला प्रेम का करता लिहून कळवू शकता.
अचानक प्रवासाची योजना करा:
तुमच्या पतीच्या वाढदिवसापूर्वी किंवा लग्नाच्या वर्धापनदिनापूर्वी प्रवासाची योजना करा. यासाठी, वीकेंड गेटवे, हिल स्टेशन किंवा त्यांच्या स्वप्नातील ठिकाण आगाऊ बुक करा. शेवटच्या क्षणी त्यांना सांगा आणि त्यांचे भाव पहा.
फोटोंचा स्लाईड शो तयार करा
तुमच्या पहिल्या डेट, लग्नाच्या दिवशी किंवा सहलीतील फोटोंचा स्लाईड शो तयार करून जुन्या आठवणी परत आणा . एकत्र बसून टीव्ही किंवा लॅपटॉप पहा. व्हिडिओ एडिट करा आणि तो एकत्र पहा.
सरप्राईज केक आणि सजावट
सकाळी लवकर किंवा रात्री 12 वाजता एक सरप्राईज केक आणून त्यांना सरप्राईज करा. फुगे, फुले आणि फोटोंनी सजवा. जेव्हा तुमचा नवरा ऑफिसमधून परत येईल तेव्हा तो ही सजावट पाहून आश्चर्यचकित होईल
Edited By - Priya Dixit