शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Updated : मंगळवार, 5 जुलै 2022 (16:37 IST)

Causes Of Divorce घटस्फोटासाठी जबाबदार कारणे, सावध रहावे

Divorce
प्रत्येक लग्नात लहान-सहान भांडणं आणि वाद होत असतात. यासाठी असे म्हणता येईल की हेल्दी रिलेशनशिपसाठी हलका ताण आवश्यक आहे. परंतु या वादात कडुपणा वाढत गेल्यास नातं संपवण्याची वेळ येते. घटस्फोटाचे प्रकरणं वाढत असल्याचे अनेक कारणं आहेत. जाणून घ्या त्यापैकी मुख्य कारणे काय आहेत -
 
एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर
जर पार्टनरचे अजून कुठे अफेयर असल्यास नात मोडण्याची वेळ येते. कारण असे करणे धोका देणे आहे. एकदा याबद्दल कळल्यास पुन्हा विश्वास करणे अवघड असतं. अशात पार्टनर घटस्फोट घेण्याबद्दल विचार करु लागतं.
 
पैशाची समस्या
आयुष्याचा जोडीदार त्याच्या करिअरमध्ये अधिक यशस्वी होतो, हे अनेकवेळा दिसून आले आहे. त्यामुळे समोरच्याच्या मनात कमीपणाची भावना दिसून येते. अशा स्थितीत नात्यात दुरावा येतो आणि परिणाम घटस्फोटापर्यंत पोहोचतो. एवढेच नाही तर खर्च करणे आणि बचत करण्याच्या सवयीमुळेही अनेक वेळा घटस्फोट होतो. कारण अनेक भागीदार त्यांच्या गरजेपेक्षा जास्त खर्च करण्याच्या प्रवृत्तीला आवर घालू शकत नाहीत. अशा परिस्थितीत भविष्याची चिंता आणि बचत करण्याची सवय दुसऱ्याला त्रास देते 
आणि घटस्फोटाचे कारण बनते.
 
संवाद नगण्य
अनेक जोड्या तुटतात कारण त्यांच्यात संवादाचे अंतर असते. कधीकधी या कम्युनिकेशन गॅपचे कारण कौटुंबिक बनते. त्याचबरोबर अनेक वेळा आपलं मन न बोलणं, 
एकमेकांसाठी वेळ न काढणं यामुळेही घटस्फोट होतो.
 
जास्त अपेक्षा
नात्यात तुमच्या जोडीदाराकडून अवाजवी अपेक्षा देखील घटस्फोटाचे कारण बनतात. कारण अपेक्षा पूर्ण झाली नाही तर मनात कटुता येते. या प्रकरणात घटस्फोट आवश्यक 
आहे.