सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: गुरूवार, 29 फेब्रुवारी 2024 (18:57 IST)

Love Blackmailing तुम्ही बेडरूममध्ये ब्लॅकमेलिंगचे शिकार तर होत नाहीये ?

Love Blackmailing खुले विचार असलेल्या पतीकडे जेव्हा पत्नी काही तक्रार करते किंवा एखादी समस्या मांडते तेव्हा तो समाधान देत नसून तिला थेट बेडवर नेतो आणि तात्पुरती ती गोष्ट टळते. कित्येकदा पार्टनरला ही सवय रोमांटिक वाटू शकते परंतु हळू-हळू कळतं की या प्रकारे इंटीमेट होणे केवळ वेळ काढणे आहे समाधान नव्हे. पण जेव्हा पत्नी समस्या पुन्हा-पुन्हा मांडते आणि समाधान मिळेपर्यंत मला हात देखील लावू नये असे म्हणते तेव्हा खरी समस्या सुरु होते.
 
इमोशनल ब्लॅकमेलिंग
ही समस्या अनेक जोडप्यांची आहे. अनेक वेळा असे क्षण येतात जेव्हा पती किंवा पत्नी दोघेही झुकायला तयार नसतात तेव्हा संबंध बिघडतात. इमोशनल ब्लॅकमेलिंग रिलेशनशिपमध्ये, विशेषत: बेडरुमटाईम दरम्यान बरेच पाहिले जाते. त्या दोघांनाही माहीत आहे की, अनेक लोक शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सर्वकाही हरतात, म्हणूनच ते ब्लॅकमेलिंगचा एक प्रकार म्हणून त्याचा वापर करू लागतात. आपल्या जीवनसाथीबद्दल आपल्याला जे काही वाटत असेल ते आपण व्यक्त करायला हवं. पती-पत्नीमधील समस्या देखील प्रेम, आदर आणि आनंदाने सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर एखादे अंतर कापत नसाल तर ते हळूहळू लांब अंतरात बदलते. तथापि हे देखील खरे आहे की शारीरिक संबंध ठेवताना परस्पर मतभेद आणल्याने आनंदात विरझण पडू शकतं आणि त्याचे विपरीत परिणाम देखील होऊ शकतात. सत्य हे आहे की जोपर्यंत दोघांना संबंध बनवताना एकमेकांसोबत आराम वाटत नाही तोपर्यंत भावनांचा आणि आनंदाचा संवाद आपोआप होत नाही.
 
संबंधाना शस्त्र बनवू नका
वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीला आपोआप आकर्षण आणि उत्तेजना येते हे देखील समजून घेणे आवश्यक आहे. या काळात पती-पत्नीला काही त्रास झाला तरी ते त्याकडे लक्ष देत नाहीत, उलट ते प्रेम आणि साहसाच्या तालात वाहत राहतात. तर लग्नानंतर काही वेळ निघून गेला की ते नित्याचे होऊन जाते. दिवसेंदिवस छोट्या-छोट्या गोष्टींमुळेही वेदना होऊ लागतात. पती-पत्नीमध्ये परस्पर समंजसपणा नसेल, तर ते भांडणाचे रूप घेते. यानंतर तुमची शारीरिक गरज आणि त्याबद्दल आवड कमी होऊ लागते. ही परिस्थिती निर्माण होताच दोघांनीही त्यावर बोलून एकमेकांवर रागावून पाठ फिरवू नये. कारण मोठमोठे प्रश्नही बोलून सोडवता येतात.
 
बेडरूम ब्लॅकमेलिंग सहजरीत्या ओळखू शकता. बऱ्याच वेळा तुमचा जोडीदार तुम्हाला सहज सांगतो की तू असे कपडे घालू नकोस कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. किंवा इतर कोणतीही बाब आपल्याप्रमाणे वळवून घेण्यासाठी प्रेमाची पाटी पुढे करणे  समजून घ्या की 'बेडरूम ब्लॅकमेलिंग'चा वापर केला जात आहे.
 
बेडरूम ब्लॅकमेलिंग टाळण्यासाठी टिप्स
1. बेडरूममधील ब्लॅकमेलिंग टाळण्यासाठी तुम्हाला उपाय शोधावे लागतील जेणेकरून तुमचे संसार थाटात सुरु राहील. तुम्हाला माहिती आहे की एकदा तुमचे शारीरिक संबंधाप्रती मन बिघडले की दिवसेंदिवस अंतर वाढत जाईल.
 
2. सवार्तआधी विनंती आणि मागणी यात फरक करायला शिका. मागणी म्हणजे जेव्हा तुमचा जोडीदार त्याच्याप्रमाणे न वागल्यावर तुम्हाला प्रेम करण्याची परवानगी देत ​​नाही. तुमच्यापासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न करत असेल.
 
3. आधी पार्टनर ओरडेल, रागावेल नंतर प्रेम करू लागेल आणि जुन्या गोष्टी विसरून जा असे म्हणेल. संबंध ठेवल्यानंतर बरे वाटेल. येथे तुम्हाला तुमच्या पार्टनरला आदर, प्रेम आणि विश्वासाचा धडा शिकवण्याची गरज आहे.
 
4. शारीरिक संबंधांमुळे कोणतीही समस्या सोडवता येत नाही हे त्याला समजावण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही त्याच्या दबावाला बळी पडलात तर तो तुमचा कधीही आदर करणार नाही.
 
5. तुम्हाला तुमच्या मतावर ठाम राहण्याची गरज आहे, परंतु तुमचे मत कसे व्यक्त करायचे हे देखील तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. त्याला कळू द्या की शारीरिक संबंध भांडणात आणणे हे कोणाच्याही हिताचे नाही.