शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: मंगळवार, 22 नोव्हेंबर 2022 (13:48 IST)

Relationship Tips: पार्टनर तुम्हाला वेळ देत नसेल तर भांडू नका, या टिप्स फॉलो करा

नातेसंबंधात एकमेकांना वेळ दिला जातो, परंतु धावपळीच्या जीवनात लोकांकडे वेळ कमी असतो. अशा परिस्थितीत जेव्हा जोडपे एकमेकांना वेळ देत नाहीत, तेव्हा अनेक समस्या आणि अंतर वाढण्याची शक्यता असते.
 
पार्टनर बर्‍याच वेळा व्यस्त असेल, तुमच्यासाठी त्याच्याकडे वेळ नसेल तर जोडप्यात भांडण होतात. पार्टनरकडून वेळ मिळवण्यासाठी पार्टनर अनेकदा त्याच्या पार्टनरकडे तक्रार करतात, या मुळे दोघांमध्ये वाद होतात. दोघांमधील भांडण हळूहळू वाढत जाते आणि प्रकरण वाढून दुरावा निर्माण होतो. 
जोडीदार खूप व्यस्त असेल तर त्याला त्रास देण्याऐवजी आणि भांडण करण्याऐवजी या टिप्स अवलंबवून त्याच्यासोबत वेळ घालवा. 
 
1 जोडीदाराशी बोला-
कोणतीही समस्या बोलून सोडवली जाऊ शकते. पार्टनर ऑफिसच्या कामात खूप व्यस्त असतो आणि तुम्हाला वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे तुमचे विचार त्याच्याशी शेअर करा. त्यांना सांगा की तुम्हाला त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवायचा आहे. त्यांचे म्हणणे ऐका आणि त्यांच्या समस्या समजून घ्या. जोडीदाराच्या कामाशी संबंधित गोष्टी त्यांना विचारा. यामुळे पार्टनर तुम्हाला कामामुळे वेळ देत नाही किंवा तो तुमच्याकडे दुर्लक्ष करतो हे स्पष्ट होईल. असं केल्याने जोडीदार देखील आपल्या भावना समजून घेण्यास सक्षम असेल.
 
2 आनंदी रहा-
आनंदी नातेसंबंधासाठी, आपण स्वतः आनंदी असणे आवश्यक आहे. जोडीदार वेळ देत नसेल तर दुःखी होऊ नका तर आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा व्यस्ततेत जोडीदारालाही रिलॅक्स वाटेल. 
 
3 घरीच डेट प्लॅन करा-
जोडीदार तुमच्यासोबत कुठेतरी जाऊ शकत नाही किंवा खूप कामामुळे जास्त वेळ घालवू शकत नाही. पण तुम्ही तुमच्या वेळेचा योग्य वापर करू शकता. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवायचा असेल तर त्यांच्यासोबत बाहेर जाण्यासाठी थांबू नका, तर घरीच डेट प्लॅन करा. जोडीदार कामावरून घरी परतल्यावर त्यांच्या आवडीचे रात्रीचे जेवण तयार करा आणि एकत्र खा आणि चित्रपट पहा. 
 
4 सरप्राईज गिफ्ट्स द्या-
नातं आनंदी ठेवण्यासाठी कमी वेळाचा वापरू शकता. तुम्ही तुमच्या पार्टनरला वेळोवेळी सरप्राईज देऊन तो क्षण खास बनवू शकता. तुमच्या जोडीदाराला भेटवस्तू देऊन तुम्ही तुमच्या नात्यासाठी व्यस्त क्षणांतून थोडा वेळ काढू शकता.
 
Edited by - Priya Dixit