रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. तीर्थ-क्षेत्र
Written By
Last Updated : सोमवार, 29 जुलै 2024 (14:53 IST)

कोपेश्वर महादेव कोल्हापूर

Kopeshwar Mahdev Temple Kolhapupr
आपल्या भारताचे प्राचीन नाव अखंड भारत होते असे काही तज्ञ सांगतात. हे अगदी बरोबर आहे याचे दाहरण आज देखील पाहावयास मिळते. भारताला अश्या काही वास्तू लाभल्या आहे ज्यामुळे कळते की आपल्या भारताची संस्कृती अनमोल आहे. भारत सारखा देश अवघ्या जगात कुठे ही नाही. 
 
महाराष्ट्रातील कोल्हापुर जवळ खिद्रापुर मध्ये कोपेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिराची वास्तुकला कोणतीही साधारण डिजाइन नाही आहे तर यामध्ये अनेक रहस्य लपलेले आहे, जे आजदेखील रहस्य आहे. या मंदिराची वास्तुकला अद्भुत आणि लक्षणीय आहे. 
 
कोपेश्वर मंदिराचा इतिहास व वास्तुकला-
खिद्रापुरचे कोपेश्वर महादेव मंदिर चालुक्य वंशाच्या उत्कृष्ट वास्तुकलेचा दर्शवते. यामंदिराचे निर्माण चालुक्यव्दारा करण्यात आले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर स्थित हे मंदिर12 व्या शतकातील 109-78 ई. स. मध्ये शैलाहार वंशाचे राजा गंधारादित्य व्दारा बनवण्यात आले आहे. कृष्णा नदीच्या काठावर स्थित हे मंदिर भगवान शंकरांना समर्पित आहे.
 
मंदिर परिसरात तुम्हाला 12 शिलालेख दिसतील. जे इतिहासाची साक्ष देतात. पण आता सध्या दोन ते तीन शिलालेख दिसतात. तसेच या मंदिरात दोन शिवलिंग आहे, त्यामधील एक भगवान शिव यांना समर्पित आहे तर दुसरे भगवान विष्णू यांना समर्पित आहे. मंदिराचे छत उघडे आहे. ज्यामुळे सूर्याची किरणे रोज महादेवांचा अभिषेक करतात. कोपेश्वर मंदिराच्या निर्माणबद्दल वेगवगेळे मत आहे. 
 
कोपेश्वर महादेवांची कथा-
असे सांगण्यात येते की, सती व्दारा दक्षच्या यज्ञ कुंडामध्ये प्राण दिल्यांनतर भगवान शंकरांना भयंकर क्रोध आला. ते सतीचे पार्थिव देह घेऊन क्रोधामध्ये तांडव नृत्य करायला लागले. चारही दिशांमध्ये हाहाकार झाला.
 
तेव्हा भगवान विष्णूंना त्यांचा क्रोध शांत करण्यासाठी यावे लागले. हे मंदिर या क्षणाचे प्रतीक आहे. क्रोधित अर्थात कुपित शिव यांना कोपेश्वर संबोधले जाते. यामुळे या मंदिरात दोन शिवलिंग आहे.  
 
नंदी जो प्रत्येक शिव मंदिराचा अविभाज्य घटक आहे, या मंदिरामध्ये अनुपस्थित आहे. याची देखील एक आख्यायिका आहे. नंदी सती सोबत पिता दक्ष यांच्या घरी गेला होता. 
 
कोपेश्वर मंदिर पर्यंत कसे पोहचावे?
कोपेश्वर मंदिर, ज्याला खिद्रापुर मंदिराच्या नावाने ओळखले जाते, कोल्हापुर, इचलकरंजी किंवा मिरज सोबत अनेक मार्गानी इथपर्यंत पोहचता येते.
 
विमान सेवा : जर तुम्ही विमानाचा प्रवास करीत आहात तर जवळच कोल्हापूरचे विमानतळ आहे. कोल्हापुरमध्ये छत्रपती राजाराम महाराज विमानतळ आहे, जे खिद्रापुर पासून 55 किमी दूर आहे. बेळगाव विमानतळ कमीतकमी 101 किमी दूर आहे. तुम्ही इथून टॅक्सीने जाऊ शकतात.   
 
रेल्वे सेवा : रेल्वेने येण्याकरिता, कोल्हापुर रेल्वे स्टेशन जवळ आहे. तिथून तुम्ही बस किंवा टॅक्सी करून कोपेश्वर महादेव मंदिरापर्यँत पोहचू शकतात.
 
रस्ता मार्ग : खिद्रापुर कोल्हापुर पासून फक्त 60 किलोमीटर दूर आहे. तसेच सार्वजनिक आणि खाजगी वाहन सेवांनी जोडलेला आहे. कोल्हापुर शहरामध्ये एसटी बस डेपो जवळ आहे. तसेच आरामदायी प्रवास करण्यासाठी तुम्ही कोल्हापूर वरून खाजगी वाहन ठरवू शकतात.